बातमी पर्यटकांसाठी : हरीहर गड “या” तारखेपर्यंत पर्यटनासाठी राहणार बंद

नाशिक :- नाशिक वनविभागाच्या पश्चिम भाग क्षेत्रात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरीहर गडावर पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

अति गर्दीमुळे व पावसामुळे संभाव्य अपघात होण्याची शक्यता असल्याने 17 जुलै 2022 पर्यंत पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हरीहर गडावर व परिसरात नागरिकांना पर्यटनासाठी प्रवेश निषिद्ध करण्यात आला असल्याचे उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, 17 जुलै 2022 पर्यंत नागरिकांनी हरीहर गडावर व परिसरात नागरिकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करून नये, तसे केल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. वरील आदेशाचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नाशिक वनविभाग व उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) पंकज गर्ग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!