त्र्यंबकेश्वर (वार्ताहर):– गेल्या दोन ते तीन दिवस सुरू असलेला पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले असताना आज पहाटे आणि सकाळी अशा दोन वेळा जोरदार पाऊस झाल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मेनरोडवर पावसाचे पाणी तुंबले होेते.

त्यामुळे दुकानात पाणी शिरते काय, अशी शक्यता वाटत होती. पाणी आल्यामुळे सकाळी देवदर्शनासाठी बाहेर पडलेले भाविक, पर्यटक यांची गैरसोय झाली. सदरच्या पावसाने त्र्यंबकेश्वर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने धबधबे पाहण्यासाठी परिसराती धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
video : https://youtu.be/IV-VwykuYcg