LPG GAS CYLINDER PRICE : सामान्यांना गॅस दरवाढीचा चटका; घरगुती गॅस सिलिंडर इतक्या रुपयांनी महागले

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- भारतामधील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा झटका दिला आहे. आज 14.2 किलो वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेेत. आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.

या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1 हजार 53 रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत 18 रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

एक जुलै रोजी दिल्लीमध्ये 19 किलोच्या म्हणजेच व्यवसायिक वापरातील सिलिंडरच्या किंमती 198 रुपयांनी कमी करण्यात आलेल्या. तर एक जून रोजी व्यवसायिक वापरातील गॅस सिलिंडरच्या किंमती 135 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. एक एप्रिल रोजी 19 किलो व्यवसायिक गॅस सिलिंडरची किंमत 250 रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरची किंमत 2 हजार 253 रुपयांपर्यंत गेलेली. तर एक मार्च रोजी एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 105 रुपयांनी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नव्याने किंमती वाढवण्यात आल्याने याचा फटका सर्वसमान्यांना बसणार आहे. दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 2021 रुपये होती.

आज त्यात 8 रुपये 50 पैशांनी वाढ झाली असून ही किंमत आता 2030 रुपयांपर्यंत पोहचली आहे. तर कोलकात्यामध्ये सिलिंडरचे दर आता 2149 वर पोहचले आहेत. मुंबईत 1990 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2195 रुपयांपर्यंत एलपीजी गॅसची किंमत कमी झाली आहे. जूनमध्ये व्यावसायिक सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते, तर मे महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. पहिल्यांदा 7 मे रोजी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती तर 19 मे रोजीही घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती.

मुंबईमध्ये घरगुती सिलिंडर आता 1 हजार 52 रुपये 50 पैशांना उपलब्ध होईल. तर कोलकात्यामध्ये हाच दर 1 हजार 79 रुपयांपर्यंत गेला आहेे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर 1 हजार 68 रुपये 50 पैसे इतका असल्याचं इंडियन ऑइल कॉर्परेशनने स्पष्ट केले आहे.

दिल्लीत गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरचा दर 834.50 रुपयांवरून आता 1053 रुपयांवर पोहोचला आहे. 14.2 किलो घरगुती सिलिंडरच्या दरात 19 मे 2022 रोजी 4 रुपयांची शेवटची कपात करण्यात आली होती. यापूर्वी 7 मे रोजी दिल्लीत 999.50 रुपये प्रति सिलिंडरचा दर होता. 7 मे रोजी एलपीजी सिलिंडर 22 मार्च 2022 रोजी 949.50 रुपयांच्या तुलनेत 50 रुपयांनी महागला. 22 मार्चलाही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. यापूर्वी, ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 899.50 रुपये होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!