सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली :- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती साडेचार महिन्यांनी वाढल्या आहेत. याआधी 4 नोव्हेंबर रोजी देशात इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. आज सकाळी 6 वाजेपासून नवे दर लागू झाले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत आणि अलीकडेच कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 81 डॉलरवरून 130 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. कच्च्या तेलाच्या किमतीच्या किमतीत कमी झाल्या होत्या, पण काल दरात पुन्हा वाढ झाली.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ही वाढ झाली आहे. पेट्रोल 84 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 83 प्रतिलिटर पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

जाणून घ्या विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई 110.82 (पेट्रोल प्रति लिटर), 95.00 (डिझेल प्रति लिटर),

पुणे : 110.67 (पेट्रोल),
93.45 (डिझेल)

नाशिक : 111.24 (पेट्रोल),
94.00 (डिझेल)

नागपूर 111.03 (पेट्रोल),
93.83 (डिझेल),

बुलढाणा : 111.33 (पेट्रोल)
94.09 (डिझेल)

हिंगोली : 111.85 (पेट्रोल)
94.62 (डिझेल)

अहमदनगर : 110.50 (पेट्रोल)
93.20 (डिझेल)

जळगाव : 112.14 (पेट्रोल)
94.87 (डिझेल)

नंदुरबार : 111.37 (पेट्रोल)
94.14 (डिझेल)

गोंदिया : 112.20 (पेट्रोल)
94.96 (डिझेल)

नांदेड : 113.25 (पेट्रोल)
95.95 (डिझेल)

रायगड : 110.49 (पेट्रोल)
93.25 (डिझेल)

चंद्रपूर : 110.66 (पेट्रोल)
93.48 (डिझेल)

परभणी : 113.50 (पेट्रोल)
96.17 (डिझेल)

धुळे : 110.52 (पेट्रोल),
93.32 (डिझेल),

यवतमाळ : 112.26 (पेट्रोल)
95.01 (डिझेल),

वाशिम :111.39 (पेट्रोल),
94.18 (डिझेल)

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!