डोक्यात व तोंडावर फावड्याने मारून पत्नीच्या खून

नाशिक (प्रतिनिधी) :– माडसांगवी माळवाडी शिवारात मागील घरगुती भांडणाची कुरापत काढून पतीने पत्नीच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी फावड्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह पाच संशयितांविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की माडसांगवी परिसरातील माळवाडी येथील संशयित विशाल राजाराम कापसे व त्याची पत्नी आरती विशाल कापसे यांच्यात जुन्या घरगुती वादातून भांडण झाले. यात तिच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की यात संशयित पती विशालने लाकडी दांडा असलेल्या लोखंडी फावड्याने पत्नी आरतीच्या डोक्यावर व तोंडावर हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झाल्याने व डोक्यात वर्मी घाव लागल्याने आरतीचा जागेवरच मृत्यू झाला.

याप्रकरणी लता रामू जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित पती विशाल राजाराम कापसे, सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे यांच्याविरोधात आडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!