पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने उचलले “हे” पाऊल

उस्मानाबाद – पत्नीच्या अनैतिक संबंधावरुन संतापलेल्या पतीने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची घटना येथील कोंड गावात घडली आहे. सतीश कवरसिंग तिवारी याचा विवाह ढाकी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या स्वाती सोबत झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन मुले आहेत. मात्र; मागील तीन वर्षापासून सतीश व त्याची पत्नी स्वाती या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.

सतीश तिवारी हा त्याच्या पत्नीसोबत ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्वॉटरमध्ये राहत होता. दरम्यान 31 मे 2022 च्या रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वॉर्टरमध्ये सतीश यांनी विवेक देशमुख आणि स्वाती हे एकत्र असल्याचे खोलीत पाहिले आणि सतीश याने त्या दोघांना जाब विचारला असता पत्नी स्वाती आणि तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांनी मिळुन सतीशला बेदम मारहाण केली. दरम्यान सतीश याने ढोकी पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल सुद्धा केली होती.

सतीशला पत्नीची वागणूक आवडत नसल्याने तो वांरवार पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पत्नी प्रियकराला सोडायला तयार नसल्याने नैराश्यातून सतीशने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी सतीशची पत्नी स्वाती आणि तिचा प्रियकर विवेक देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत प्रेत ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे पोलिसांनी काही वेळातच सतीशच्या पत्नीला ताब्यात घेतले. ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन सतीशवर अंत्यसंस्कार केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!