‘मी रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही’; पंकजा मुंडेंचा एल्गार

बीड : मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

मी आता कोणताही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा बीड येथे दसरा मेळावा होत आहे. यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा दसरा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. स्व. मुंडे साहेबांच्या विरोधकांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली. परंतु मी कधीही खालच्या पातळीवर टीका केलेली नाही. ते माझ्या रक्तात नाही.

माझ्याकडे तुमच्यासाठी द्यायला खुर्च्या नाहीत. मला तुमची काहीच व्यवस्था करता आलेली नाही. ती माझी ऐपत नाही. तुम्ही मला सांभाळून घेताय, ही मोठी गोष्ट आहे. संघर्षाशिवाय नाव होत नाही. भगवानबाबांनाही खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. भगवानगड स्थापन कारावा लागला. श्रीकृष्णालाही संघर्ष करुन द्वारका स्थापन करावी लागली.

त्या पुढे म्हणाल्या की, स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनाही संघर्ष कारावा लागला. ४० वर्षे त्यांनी संर्घष केला. तेच रक्त माझ्यात असल्यामुळे मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. गर्दी माझी शक्ती आहे. हेच जे.पी. नड्डांनी मला सांगितलं. मी फक्त गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. तर मी पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलजींचा, प्रमोदजींचा नरेंद्र मोदी, अमित शाहांचा वारसा चालवते. मी शत्रुविषयी वाईट बोलत नाही तर माझ्याविषयी वाईट बोलणारांवर टीका कशी करेल. बीडमधील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे बोलत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!