नवी दिल्ली : कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टीफिकेट एक्सझामीनेशन (CISCE) च्या 10वी चा निकाल उद्या जाहीर होणार आहे.

याबाबत बोर्डाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उद्या दि. 17 जुलै रोजी सायं. 5 वाजता icse बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थी एसएमएस द्वारे पण आपला निकाल पाहू शकतो. निकालासाठी दोन्ही सेमिस्टर ला समान महत्व दिले जाणार आहे.

पहिली सेमिस्टर व दुसरी सेमिस्टर आणि प्रोजेक्ट (अंतरिम मूल्यांकन) चे गुण अंतिम गुणांमध्ये जोडले जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे
या वेबसाईटवर पहा तुमचा निकाल
cisce.org
results.cisce.org
results.nic.in
असा पहा तुमचा निकाल
1. बोर्डाच्या cisce.org या वेबसाईटवर जा
2. होम पेजवर “ICSE RESULT 2022” या लिंकवर क्लिक करा
3. आपला रोल नंबर किंवा जन्मतारीख टाकून लॉग इन करा
4. CLASS 10TH ICSE RESULT 2022 ही स्क्रीन उघडेल
5. आपल्या निकालाची डिजिटल मार्कशीट डाऊनलोड करा.