इगतपुरी तालुक्यात पुतण्याचा चुलतीवर अत्याचार

इगतपुरी (वार्ताहर) :- इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील 28 वर्षीय विवाहित चुलतीवर पुतण्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने घोटी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित 22 वर्षीय पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीत नमूद केलेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील 28 वर्षीय विवाहित महिला मांजरगाव येथे विवाहाच्या पुर्‍या करण्यासाठी गेली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास किरण वसंत दिवटे (वय 22, रा. शेणवड बुद्रुक ता. इगतपुरी) हा 28 वर्षीय तरूण घराजवळ पीडित चुलतीकडे आला. पीडित चुलतीला त्याने आवाज देऊन सांगितले की, नाना (पीडित महिलेचा पती) दारू पिऊन पडला आहे, माझ्यासोबत चल तुला दाखवतो, कुठे आहे ते. महिलेने पुतण्यावर विश्‍वास ठेवत ती त्याच्यासोबत गेली. रात्रीचा अंंधार असल्याने त्याने महिलेला नाल्यासारख्या खड्डयाजवळ नेले आणि तिचे तोंड दाबून दिला मारहाण केली तसेच चुलतीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी त्याने दिली.

पीडित महिलेने पतीला सर्व घटना सांगितली. त्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह महिलेने अत्याचार झाल्याची फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी पुतण्या किरण वसंत दिवटे याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पोलीस चौकशीत गुन्हा केल्याची कबुल दिली आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेचे कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केदारे, गायकवाड यांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!