पळून जाण्याच्या प्रयत्नात कैद्याने 35 फुटांवरुन उड़ी मारली आणि…

रायगड | भ्रमर वृत्तसेवा : पेण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 35 फुटांवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्नात आरोपीचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी बिरु महतो याने अलिबाग जिल्हा कारागृहातून 35 फूट दगडी तटबंदीवरुन पळून जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला. मात्र, दगडी भिंतीवरुन उडी मारल्याने त्याच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. अलिबाग पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण पोलीस ठाण्यातील कोठडीत बिरु महतो हा अटकेत होता. पोलिसांनी बिरुला 30 जानेवारीला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शौचालयाला बाहेर काढले. यावेळी त्याने पोलिसांची नजर चुकवून बाजूच्या भिंतीवरुन पलायन केले. या प्रकाराने पोलिसांची धावपळ सुरु झाली. अखेर 12 तासांनी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आरोपीची पोलीस कोठडी संपली असल्याने 31 जानेवारीला पेण न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सूनावल्याने आरोपीला अलिबाग येथील जिल्हा कारागृहात आणले. जिल्हा कारागृहात सायंकाळी सात वाजता आणले असता कारागृह अंमलदाराला धक्का देऊन आरोपी बिरु याने कारागृहाच्या 35 फूट दगडी तटबंदीवरुन उडी मारुन पलायन केले.

कारागृह पोलीस प्रशासनाने तातडीने याबाबतची माहिती वर्दी अलिबाग पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग पोलिसांनी तत्काळ कोँबिंग ऑपरेशन सुरु केले. कारागृहा लगतच्या परिसराची झाडाझडती सुरु करण्यात आली. दहा मिनटातच एका घरामागील सरपण ठेवण्याच्या जागेत तो लपलेला आढळून आला.

बिरुला अटक करून त्याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!