अबब ! जालन्यात प्राप्तीकर विभागाच्या कारवाईत सापडले तब्बल “इतक्या” कोटींचे घबाड

जालना (भ्रमर वृत्तसेवा):- जालन्यात प्राप्तीकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल 390 कोटींचे घबाड सापडले आहे.

संबंधितांच्या निवासस्थान व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 58 कोटींची रोख रक्कम तसेच 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. 1 ते 8 ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास 13 तास रोख रक्कम मोजत होते.

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने 1 ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथके तयार करण्यात आली होती. छापे टाकले असता एकूण 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले. यामध्ये 58 कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच 300 कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रेही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापार्‍याचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!