मुंबई : श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान IND vs PAK भिडणार आहेत. दोन्ही संघ 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने आमने-सामने असल्याने या निमित्ताने एक हाय व्होल्टेज सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या वर्ल्ड कप मध्ये ही लढत सर्वात लक्षवेधी ठरणार आहे. 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये लढत होईल. आशिया चषक टी 20 फॉर्मेट मध्ये खेळला जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे.