नवी दिल्ली : वेस्ट इंडिज दौर्यासाठी भारतीय संघाची टी20साठी घोषणा केली आहे. संघात केएल राहुल, रविचंद्रन अश्विन व अर्शदीप सिंगचे पुनरागमन झाले असून विराट कोहली, जलदगती गोलंदाज उमरान मलिकला वगळण्यात आले आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर अश्विनने एकही टी-20 सामना खेळलेला नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. अर्शदीपने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये शानदार गोलंदाजी केली. मात्र, दुसर्या आणि तिसर्या टी-20साठी त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. आता कर्णधार रोहितने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

असा असेल संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवन कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.