नाशिक (प्रतिनिधी) :- प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत असून यावेळेस त्यांनी जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात किर्तनादरम्यान केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलंय.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित किर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी करोना कालावधीमध्ये ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेऊन पास झालेल्यांना नोकरी मिळणार नाही, असं वक्तव्य केलंय.

तसेच पागर देताना बुद्धी तपासली पाहिजेत, असेही इंदुरीकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे.