IPL 2022 : नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी मेगा ऑक्शनमध्ये फक्त ‘इतक्या’ खेळाडूंवर लागणार बोली

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनसाठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे.

आयपीएलच्या या हंगामात नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ विदेशी खेळाडूंचा समावेश होता. त्यापैकी २७० कॅप्ड (राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे), ९०३ अनकॅप्ड, आणि ४१ सहयोगी देशाच्या खेळाडूंनी नावे नोंदविली होती. त्यात ७० विदेशी खेळाडू असतील. पण, आता यातून फक्त ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ असून बहुचर्चित आयपीएल स्पर्धेचा हा 15 वा हंगाम आहे.

तसेच या लिलावात सर्वाधिक बेस प्राइस दोन कोटी रुपये आहे. तसेच 48 खेळाडूंनी आपली बेस प्राइस दोन कोटी रुपये ठेवली आहे. या यादीत 20 खेळाडूंनी आपली बेस प्राइस 1.5 कोटी रुपये ठेवली आहे. तर 34 खेळाडूंनी आपली बेस प्राइस एक कोटी रुपये ठेवली आहे. तसेच या लिलावात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 47 क्रिकेटपटू आहेत. तर इंग्लंड आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 24 क्रिकेटपटू आहेत. वेस्ट इंडिजचे 34, दक्षिण आफ्रिकेचे 33 आणि श्रीलंकेचे 23 खेळाडू असून अफगाणिस्तानचे 17 खेळाडू आहेत. तर बांगलादेश-आयर्लंडचे प्रत्येकी पाच, झिम्बाब्वेचा एक, नांबियाचे तीन, नेपाळचा एक, स्कॉटलंडचे दोन आणि अमेरिकेचा एक खेळाडू आहे.

दरम्यान या लिलावात सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघातील सदस्य यश धूल, विकी ओत्सवाल, राजवर्धन हंगर्गेकर यांच्यासह देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पांड्या, शाहरूख खान, दीपक हुडा, आवेश खान, आदी युवा खेळाडूंसाठीही चुरस रंगताना दिसणार आहे. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!