ईश्‍वरी झुंजली; महाराष्ट्राचा निसटता पराभव

नाशिक (प्रतिनिधी) : बीसीसीआय आयोजित अमिनगाव येथे झालेल्या वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात नाशिकची महिला क्रिकेटपटू ईश्‍वरी सावकारने चिवट फलंदाजी केली, मात्र ती महाराष्ट्राचा पराभव वाचवू शकली नाही.

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करीत ७ बाद १७० धावा केल्या. त्याला उत्तर देतांना महाराष्ट्राचा संघ १६२ धावांत गारद झाला. महाराष्ट्र संघातर्फे नाशिकच्या ईश्‍वरी सावकार हिने सर्वाधिक ४५ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांची हवी तेवढी साथ मिळाली नाही.

एस.ए. लोणकर हिनेही खिंड लढविण्याचा प्रयत्न केला. तिने ४४ धावा केल्या. इतर फलंदाज मात्र टिकाव धरू शकले नाही. ईश्‍वरी सावकार हिने ९५ चेंडूत ४५ धावा करीत ३ चौकार ठोकले. महाराष्ट्राला या सामन्यात ८ धावांनी निसटता पराभव पत्कारावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!