युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावून एका षटकात 36 धावा करण्याचा पराक्रम युवराजने केला होता. असाच पराक्रम आज बर्मिगहॅम येथे सुरु असणार्या पाचव्या कसोटीमध्ये पहायला मिळाला.

दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने फलंदाजी करत त्याच्या नावावर नविन विक्रम केला. या पूर्वी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता. त्याने 2003 साली पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 28 धावा कुटलेल्या.
सामन्यातील 84व्या आणि दुसर्या दिवसातील 11 व्या षटकामध्ये बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडची जबरदस्त धुलाई केली. एक वाइड आणि एका नो बॉलच्या जोरावर बुमराहने या षटकामध्ये तब्बल 35 धावा कुटल्या. या षटकामधील शेवटचा चेंडू वगळता प्रत्येक चेंडू बुमराहने सीमेपार धाडला. बुमराहची ही धुवाधार खेळी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरुन बुमराहचा फोटो पोस्ट करत, हा बुमराह आहे की युवराज? 2007 च्या आठवणी ताज्या झाल्या, असे तो म्हटला.
बुमराहने असे झोडले ब्रॉडला
- पहिल्या चेंडूवर चौकार
- ब्रॉडने टाकलेल्या दुसर्या चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली आणि तो फलंदाजाबरोबरच यष्टीरक्षकाच्याही डोक्यावरुन चौकार गेला. उंचीमुळे हा चेंडू वाइड देण्यात आला.
- त्याच्या पुढच्या चेंडूवर ब्रॉडला बुमहारने षटकार लगावला. परंतु ब्रॉडने चेंडू टाकताना क्रीजबाहेर ओलांडल्याने नो बॉल देण्यात आला. चेंडू बुमराहच्या बॅटला वरच्या भागा लागला आणि षटकार गेला.
- ब्रॉडच्या पुढच्या चेंडूवर बुमराहने चौकार लगावला. ब्रॉडने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा अंदाज चुकला आणि बुमराहने त्याचा फायदा घेत चौकार लगावला.
- षटकातील तिसर्या चेंडूवरही बुमराहने चौकार लगावला.
- चौथ्या चेंडूवर पुन्हा बुमराने चौकार लगावला.
- पाचव्या चेंडूवर ब्रॉडला बुमराहने खणखणीत षटकार लगावला.
- षटकातील शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतली.
VIDEO : https://twitter.com/CricCrazyJohns/status/1543184486170775552?s=20&t=HAIJ-ieXl47SWGIVrFa5aw