नाशिक (प्रतिनिधी) :- बंगलोर मध्ये सुरू असलेले युनिव्हर्सिटी खेलो इंडिया मध्ये नाशिकचा अजिंक्य वैद्यने जुडो या खेळात कास्य पदकाची कमाई केली.

66 किलो वजनी गटात खेळताना अजिंक्य वैद्य याने पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूला पराभूत केले. त्याने आतापर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या असून सप्टेंबरमध्ये चीन येथे होणाऱ्या एशियन गेम साठी देखील त्याची निवड झाली आहे. यापूर्वी कॉमनवेल्थ गेममध्ये भारतासाठी पदक मिळवले होते.
त्याच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश कुमार बागुल, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, मित्रविहारचे अध्यक्ष विनोद कपूर, महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे खजिनदार रविंद्र मेतकर, माधव भट, ज्युदो प्रशिक्षक विजय पाटील योगेश शिंदे स्वप्नील शिंदे आणि सुहास मैद यांनी अभिनंदन केले.