कसारा घाटात पहाटे ट्रक दुभाजकावर आदळून 1 ठार; 3 गंभीर जखमी

इगतपुरी (भास्कर सोनवणे) :- कसारा घाटात आज पहाटेच्या सुमारास ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने त्याखाली दबून एक जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना कसारा बायपास साईबाबा खिंडीजवळ ट्रक (क्रमांक एम.एच.18 बी 8566) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रक पलटी होऊन 2 जण ट्रकच्या खाली दबले गेले. ही घटना आज पहाटे घडली. या भीषण अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीपैकी एक जण ट्रकच्या खाली अडकलेला होता.

त्याला आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शाम धुमाळ, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, जस्विंदर सिंग, बाळू मंगे यांनी क्रेनच्या मदतीने 2 तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र ट्रकचालक ट्रक खाली दबून जागीच ठार झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसारा पोलीस, 108 रुग्णवाहिका, 1033 रुग्णवाहिका, टोल पेट्रोलिंग मदतीला आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!