सांगली (भ्रमर वृत्तसेवा):- एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. सांगलीतील उपजिल्हाधिकारी महिला अधिकार्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास जॉगिंगला गेलेल्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला केला.

अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केले आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असताना हा प्राणघातक हल्ला झाला आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षलता गेडाम असे या महिला उपजिल्हाधिकारी यांचें नाव आहे.
गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडण्याचा प्रयत्न केला. उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर गलिच्छ भाषेचा वापर केला. त्यानंतर हात लावणार्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले.