नाशिकमध्ये बांधकामाच्या साईटवरून पडल्याने मजुराचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : बांधकामाच्या तिसर्‍या मजल्यावरून जमिनीवर पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जत्रा हॉटेलजवळ घडली.

किरण वाल्मीक कुमावत (वय २८, रा. कामटवाडा, डीजीपीनगर, नाशिक) असे तिसर्‍या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. कुमावत हा काल (दि. २३) जत्रा हॉटेलजवळील हर्ष अपार्टमेंट, लभडेनगर येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडला.

त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचे मेहुणे दगडू बेलदार यांनी त्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!