नाशिक :- ज्वेलरी शोरूम मध्ये सोन्याच्या बांगड्या पाहण्याच्या बहाण्याने ग्राहक महिलेनेच लांबविल्या 2 लाखांच्या बांगड्या लांबविल्याची घटना शरणपूर रोडवर घडली. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे उघडकीस आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 14 जुलै रोजी अंजु चोपडा नामक महिला शरणपूर रोडवरील तनिष्क शोरूम मध्ये आली होती. तेथे आल्यानंतर तिने बऱ्याच बांगड्या बघितल्या. परंतु, पसंत न आल्याने ती दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास तिथून निघून गेली.

15 जुलै रोजी रात्री विक्री झालेला व शिल्लक असलेला स्टॉक तपासत असताना त्यामध्ये 36.209 ग्रॅम वजनाच्या 2 लाख 16 हजार 354 रुपये किमतीच्या 2 बांगड्या दिसल्या नाही. म्हणून फिर्यादी अपूर्व दराडे यांनी शोरूम मध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा अंजु चोपडा ही महिला 14 जुलै रोजी दु.1.10 वाजेच्या सुमारास शोरूम मध्ये आली.
तिने हात चलाखीने 2 बांगड्या चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार दराडे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.