“बखर लासलगावची” या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

 

लासलगाव : लासलगावाचे नाव जगाच्या नकाशावर कांदयाचे गांव म्हणून ओळखले जाते पण ‘कांदयाचे गाव’ म्हणून हि ओळख निर्माण कशी झाली?त्या साठी योगदान देणाऱ्या व्यक्ति कोण? अनेक संताचेही वास्तव्य या गावाला लाभलेले आहे ते कसे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वास्तव्य लासलगावी होते का? ते केव्हा होते?

अहिल्याबाई होळकर यांनी सरदार फणसे यांना लासलगाव हे गाव ईनाम का दिले? सरदार यशवंतराव फणसे यांचे अहिल्याबाईच्या कन्या मुक्ताबाई यांच्या सोबत लग्न झाल्यानंतर ते लासलगावी वास्तव्यास होते का? इतिहासात कधी लासलगाव किल्ला परिसरात ब्रिटीशांचे व होळकर यांचे युद्ध झाले होते का? या आश्चर्यकारक, उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरे “बखर लासलगावची” या पुस्तकातुन मिळणार आहे. लासलगाव चा शैक्षणिक, आर्थिक पाया कसा कसा भरत गेला? लासलगावचा सर्वांगीन इतिहास या पुस्तकातुन वाचायला मिळणार आहे.

या पुस्तकातील माहिती ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी असुन लासलगाववर प्रेम करणा-या मंडळीच्या आणि इतिहास अभ्यासकांच्या संग्रही असावे असेच हे पुस्तक असणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि. ५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११:०० वा. ‘स्वामी रेसोर्ट’ येथे होणार असुन या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन पुस्तकाचे लेखक, इतिहास अभ्यासक श्री. संजय बिरार यांनी केले आहे.

“इतिहास हा पिढ्यांपिढ्या घडत असतो. आज घडलेली घटना काही काळ उलटुन गेल्यावर तो इतिहास असतो. इतिहासाचा मागोवा घेतांना लक्षात येते कि, एक गाव घडवण्यासाठी किती तरी प्रगतशील, सुसंस्कारी पिढयांचे योगदान असते, मात्र त्यांच्या कार्याचे महत्व पुढच्या पिढीला तेवढे नसते कारण कालपरत्वे त्यांचे प्रश्न बदलत्या परिस्थिती नुसार वेगवेगळे असतात. असेच एक गाव लासलगाव ते कसे-कसे उभे राहत गेले, त्याचा मागोवा या पुस्तकाच्या निमित्ताने घेण्याचा आणि लासलगावचा इतिहास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न मी या ‘बखर लासलगावची’ या पुस्तकातुन केला आहे.”

संजय बिरार, लेखक.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!