गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन

मुंबई :- भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर (वय 92) यांचे आज सकाळी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आले. मात्र ५ फेब्रुवारीला पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नाशिककरांना लतादीदींनी नाशिक भेट राहील स्मरणात

सन 1999 मध्ये वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी मंगेशकर कुटुंबीय नाशकात आले होते. यावेळी केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लतादीदी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना मंगेशकर आणी हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव उपस्थित होते. लता मंगेशकर यांनी यावेळी गाणे म्हटले नव्हते मात्र उषा मंगेशकर यांनी मुंगळा आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी सर्जा राजाची जोडी या गीतांनी नाशिककरांना मंत्रमुग्ध केले होते. वसंत व्याख्यानमालेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. लतादीदींना पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. फक्त त्यात उणीव भासत होती आशा भोसले यांची. लता दीदींच्या जाण्याने नाशिककरांना आठवण आज आल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!