गिरणारेत आज सकाळी मजुरावर बिबट्याचा हल्ला

नाशिक (प्रतिनिधी) :- गिरणारे गावामध्ये मजुरीसाठी आलेल्या एकनाथ धावडे या व्यक्तीवर सकाळी बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या परिसरामध्ये सातत्याने बिबट्यांचे वास्तव्य असून सातत्याने या परिसरात नागरिकांवर हल्ले होत आहेत. अशीच एक घटना मागच्या आठवड्यात घडल्यानंतर पुन्हा एकदा नाशिक तालुक्यातील गिरणारे या गावामध्ये मजुरीसाठी जात असलेल्या एकनाथ तुळशीराम धावडे या व्यक्ती वर सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे धावडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळच्या वेळेस गिरणारे व लगतच्या परिसरातील नागरिक हे शेतीकामासाठी आणि इतर कामांसाठी हे घराबाहेर पडत असताना ही घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!