सातपूर (प्रतिनिधी) :- येथील अशोकनगर परिसरात आज सकाळी आढळलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.

अशोकनगर परिसरातील पंढरीनाथ काळे यांच्या शिवतिर्थ यांच्या बंगल्याच्या जिन्यात सकाळी सात वाजता बिबट्या दिसला होता. नंतर त्याने शौचालयावरील पोटमाळ्यावर जाऊन बसला. याबाबत नागरिकांनी त्वरीत पोलिसांना व वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे पथक त्वरीत घटनास्थळी दाखल होत. सुमारे तीन तासांनंतर बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. भरवस्तीत सकाळी बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

काही दिवसांपूर्वी शहरातील सिटी सेंटर मॉलजवळ बिबट्या दिसला होता. त्याचबरोबर सातपूर एमआयडीसीतील काही कंपन्यांच्या आवारात बिबट्याचा संचार दिसून आला होता. तेव्हापासून वनविभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत होते. त्यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली होती. घटनास्थळी त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
व्हिडिओ https://youtu.be/K7ZlHGPECwA