Home क्राईम गुन्हेशाखेच्या युनिट एककडून देशी कट्ट्यासह तडीपारास अटक

गुन्हेशाखेच्या युनिट एककडून देशी कट्ट्यासह तडीपारास अटक

0
नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : दोन वर्षांकरीत शहरातून तडीपार असलेला धनेश पंढरीनाथ धोत्रे (रा. मखमलाबाद) हा विनापरवानगी शहरात  आल्याने गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एकूण 31,500/- रुपये किमतीचे एक देशी कट्टा व तीन काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी, की गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अंमलदार प्रशांत मरकड यांना धनेश धोत्रे घरी येणार असल्याची गुप्त खबर मिळाली. धनेश धोत्रे म्हसरूळ पोलीस ठाण्याकडून दोन वर्षांकरिता शहर व ग्रामीण परिसरातून हद्दपार करण्यात आला होता. त्याच्या राहत्या घरी इरीगेशन कॉलनी, मखमलाबाद शिवार येथे येताच पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, पोलीस अंमलदार काळू बेंडकुळे, प्रवीण कोकाटे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, नीलेश पवार, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, कविश्‍वर खराटे, मुक्तार शेख, विशाल देवरे, समाधान पवार, अण्णासाहेब गुंजाळ, गणेश वडजे, प्रतिभा पोखरकर यांनी सापळा रचून त्यास शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध तडीपारीचा भंग आणि बेकायदा शस्त्रे बाळगणे अशा कलमान्वये म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.