Home क्राईम चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून एकाचा मृत्यू

चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून एकाचा मृत्यू

0
संग्रहित छायाचित्र

नाशिक  | भ्रमर वृत्तसेवा : “तू घरी का गेला नाहीस?” अशी विचारणा केल्याच्या कारणावरून व चेष्टामस्करीतून झालेल्या वादात एका इसमाचा जमिनीवर पडून मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शिवाजीवाडीत घडली.

या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी जया संतोष वांगाडे (वय 30, रा. मनपा शाळेच्या बाजूला, रिक्षा स्टॅण्डजवळ, शिवाजीवाडी, भारतनगर, नाशिक) यांचे मयत पती संतोष विष्णू वांगाडे (वय 36) हे काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास लघुशंकेकरिता शिवाजीवाडी मनपा शाळेसमोर असलेल्या वाळूच्या ढिगार्‍यासमोर जातो, असे सांगून घरातून गेले होते. त्यावेळी काळूबाईच्या जुन्या घरासमोर संशयित आरोपी विष्णू किसन पवार (वय 35, रा. शिवाजीवाडी, भारतनगर, नाशिक) हा तेथे बसलेला होता. संतोष वांगाडे यांनी विष्णू पवारला “तू घरी का गेला नाहीस,” अशी विचारणा केली. या कारणावरून दोघांत चेष्टामस्करी होऊन पुढे आपापसात वाद झाला. आरोपी विष्णू याने संतोष वांगाडे यांना जोराचा धक्का दिल्याने ते तोल जाऊन जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला, पोटाला व पाठीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जया वांगाडे यांच्या फिर्यादीनुसार भा. दं. वि. कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, विष्णू पवार याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.