Home क्राईम ग्राहकाने पीएनजी ब्रदर्सला सहा लाख रुपयांना फसविले

ग्राहकाने पीएनजी ब्रदर्सला सहा लाख रुपयांना फसविले

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : गंगापूर रोडवरील एका सुवर्णपेढीत सोन्या, चांदीचे दागिने खरेदी करून त्या बदल्यात दिलेला चेक न वटल्याने सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

या घटनेची गंगापूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नितीन गणपत पवार (वय 32, रा. काळेनगर) हे गंगापूर रोडवरील पीएनजी ब्रदर्स, बास्को सेंटर, गंगापूर रोड येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. या सुवर्णपेढीत संशयित संदीप दिलीप बोडके (रा. टाकळीभान, श्रीरामपूर) याने 5 लाख 84 हजार 58 रुपयांचे दागिने बुक केले.

या बदल्यात त्याने आय. डी. बी. आय. बँक, श्रीरामपूर शाखेतील खाते क्रमांक 053140000170727 या खात्याचा धनादेश क्रमांक 423698 देऊन 24 ऑगस्ट रोजी बोडके याने पी. एन. जी. ब्रदर्स, सुवर्णपेढीतून 3 लाख 77 हजार 260 रुपये किंमतीची 72.700 ग्रॅम वजनाची सोन्याची एक चेन, 1 लाख 5 हजार 30 रुपये किमतीचे 20.240 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, तसेच 84 हजार 637 रुपये किमतीचे 16.310 ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट असे एकूण 5 लाख 84 हजार 58 रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले. परंतु दिलेला धनादेश न वटल्याने सुवर्णपेढीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बोडके याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे अधिक तपास करीत आहेत