Home क्राईम रिक्षातील दोन महिला सहप्रवाशांनी ४७ हजारांचा ऐवज लांबविला

रिक्षातील दोन महिला सहप्रवाशांनी ४७ हजारांचा ऐवज लांबविला

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : ठक्कर बझार ते माऊली लॉन्सदरम्यान रिक्षातील दोन सह महिला सहप्रवाशांनी पर्ससह 47 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल घडली आहे.

या घटनेची सरकारवाडा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की अंजली गणेश कुलकर्णी (वय 32, रा. डीजीपीनगर क्रमांक 2, कामटवाडे, नवीन नाशिक) या दागिने असलेली लहान पर्स छोट्या बॅगेत ठेवून माऊली लॉन्स येथून ठक्कर बझार बस स्थानकात जाण्यासाठी रिक्षात बसल्या. यावेळी त्यांच्याजवळ रिक्षात दोन महिला सहप्रवासीही बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळ दोन वर्षांचे बाळही होते. प्रवासादरम्यान नकळत रिक्षातील महिला सहप्रवाशांनी अंजली कुलकर्णी यांची पर्स लांबविली. पर्समध्ये 47 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार धारणकर अधिक तपास करीत आहेत.