Home क्राईम महिलेचा विश्वास संपादन करून ९६ हजारांची फसवणूक

महिलेचा विश्वास संपादन करून ९६ हजारांची फसवणूक

0

नाशिक  | भ्रमर वृत्तसेवा : फळ विक्रेत्या महिलेचा व तिच्या मुलाचा विश्‍वास संपादन करून अनोळखी इसमाने सोन्याचांदीच्या दागिन्यांसह अ‍ॅक्टिव्हा मोपेड घेऊन जात फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी अनिता रामेश्‍वर पवार (वय 40, रा. घर नंबर 141, दत्तमंदिराजवळ, विद्युतनगर, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक) ही महिला चित्रकूट सोसायटीसमोर फळ विक्रीची गाडी लावते. काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादी पवार व त्यांच्या मुलाचा मित्र शशिकांत शिरीष उबाळे यांच्याशी बोलून त्यांचा विश्‍वास संपादन केला. यावेळी अनोळखी इसमाने फिर्यादी महिलेची एक तोळा वजनाची 31 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, सोन्याची कर्णफुले, 50 हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाची फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍या अलका शाहू साळवे यांची पोत व दोन सोन्याच्या अंगठ्या, तसेच फिर्यादीच्या मुलाचा मित्र शशिकांत उबाळे यांची एमएच 15 एफएन 7637 या क्रमांकाची 15 हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा मोपेड पळवून नेत फसवणूक केली.

ही घटना लक्षात आल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून, अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करीत आहेत.