Home नाशिक गोदावरीला पूर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गोदावरीला पूर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या ७२ तासापासून दमदार पाऊस सुरू आहे. तर शहरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत २२.९.मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच गंगापूर धरण ९८ टक्के भरल्याने धरणातून गोदावरी नदीपात्रात 4 हजार 009 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. तर याच पाण्याचा विसर्ग आज सकाळी ७ वाजता २ हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे.  

तसेच होळकर पुलाखालून गोदावरी नदीच्या पात्रात ६ हजार क्युसेक इतके पाणी प्रवाहित झाल्याने दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागले आहे. यामुळे गोदावरीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.  तर  जोरदार पावसामुळे शहरातील गोदावरी काठावर आपत्कालीन जवान तैनात करण्यात आले असून नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   

दरम्यान गोदा घाटावरील छोट्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तर दारणातून 7 हजार 200 क्यूसेक आणि नांदूरमध्यमेश्वरमधून 23 हजार 905 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.