Home नाशिक बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

0
संग्रहित छायाचित्र

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा :  सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात इयत्ता 10 वीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आणि उच्च माध्यमिक 12 वीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे लेखी व प्रात्याक्षिक परीक्षांचे नियोजन यापूर्वी प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानुसार 12 वीच्या अरेबिक (36) या विषयाची पुरवणी परीक्षा मंगळवार 21 सप्टेंबर 2021 रोजी दु. 3 ते 6 या वेळेत घेण्यात येणार होती. तथापि सदर परीक्षा 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

इयत्ता 12 वी लेखी व अन्य परीक्षेच्या उर्वरीत वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील वरील अंशत: बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.भोसले यांनी केले आहे.