म्हेळुस्के (वैभव पगार) : दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र करंजी हे भगवान दत्तात्रयांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. येथील आश्रमांचे ठाणापती महंत परमपूज्य श्री सुभाषगिरीजी महाराज यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांचा समाधी सोहळा उद्या शुक्रवार (दि. २८) रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र करंजी देवस्थान येथे होणार असल्याची माहिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांनी दिली.

महंत सुभाषगिरीजी महाराज यांचे वय ८० वर्षे पेक्षा जास्त होते. त्यांनी जवळपास २१ वर्षे मौन पाळले. त्यांनी करंजी आश्रमांचे ठाणापती पद स्वीकारल्यानंतर परिसराचे सौंदर्य वाढविले.
त्यांच्या निधनाच्या बातमीने भाविकांत शोककळा पसरली असून त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी अनेक महंत उपस्थित राहणार आहेत.