बुलढाणा । भ्रमर वृत्तसेवा : हळूहळू सिंदखेडराजा तालुक्यात कोरोनाचा (Corona) प्रकोप वाढत असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यातील साखरखेर्डा (Sakharkherda) परिसरातील तब्बल ९२ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह (Positive) आढळून आल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साखरखेर्डा परिसरातील २४१ शिक्षकांची (teachers) कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ९२ शिक्षकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच या जिल्ह्यातील काही शाळा आजपासून (School) सुरू होणार होत्या. पंरतु शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करुन घेणे गरजेचे होते. त्यानुसार साखरखेर्डा परिसरातील शिक्षकांनी चाचण्या करुन घेण्यात आले होते. त्यामध्ये ९२ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले.
दरम्यान हे शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आल्याने या परिसरातील शिक्षक, विद्याथी, पालक, आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.