Home क्राईम धक्कादायक : २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या

धक्कादायक : २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या

0

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : मुंबईत काही दिवसांपूर्वीच शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच दरम्यान शहरात आणखी एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे. मुंबईच्या कुर्ला भागातील एका इमारतीच्या टेरेसवर लिफ्ट रुममध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कुर्लाच्या (Kurla, Mumbai) एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर त्वरित मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात नराधमविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला त्यानंतर, मुलीची मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत बंद असल्याने एक १८ वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह इंस्टाग्रामवर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला असताना, त्याने हा मृतदेह पाहून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. या मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम असून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात बलात्कारासह हत्येचा गुन्हा अनोळखी आरोपी विरोधात नोंदविला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.