दोन हजारांची नोट खाली पडल्याचे सांगत व्यापाऱ्याला ९ लाखांना गंडा

जालना । भ्रमर वृत्तसेवा : रस्त्यावर एखादी दहा-वीस रुपयांची नोट टाकून एखाद्याला फसवल्याचे किंवा त्याची खिल्ली उडवल्याचे प्रकार अनेकदा चित्रपटांमधून दाखवण्यात आलेले आहेत. तसाच प्रकार करून भर दिवसा व्यापाराला लुटल्याची  (Badnapur Robbery) घटना जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) बदनापूर तालुक्यात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चोरटयांनी एका व्यापाऱ्याला तुमचे दोन हजार रुपये (two thousand rupees note) पडल्याचे सांगितले. त्यांनतर व्यापाऱ्याला रोखले आणि व्यापाऱ्याकडे असलेली पैशांची भरलेली बॅग (bag loaded with cash) घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. जनार्दन चपटे असे या पीडित व्यापाऱ्याचे नाव असून त्याने जालन्यातील एचडीएफसी बँकेतून शेतकऱ्यांना देण्यासाठी ९ लाख रुपये काढले होते.

तर हे पैसे घेऊन व्यापारी जनार्दन चपटे बदनापूरला जात असताना धोपटेशोर फाट्यावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना रस्त्यात थांबवून तुमची दोन हजारची नोट खाली पडल्याचे सांगितले. त्याचवेळी जनार्दन चपटे हे आपली दुचाकी थांबवून सदर नोट शोधत होते आणि तेव्हाच या दोन भामट्यांनी व्यापारी जनार्दन चपटे यांची दुचाकीला लटकवलेली बॅग घेऊन पोबारा केला.

दरम्यान याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. तर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!