Home क्राईम समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणात चौकशी सुरु

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणात चौकशी सुरु

0

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी होणार आहे. पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. विविध राजकीय नेत्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर आता समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

तसेच समीर वानखेडे यांनी मुंबई सेशन्स कोर्टात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केले असून स्पेशल त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप झाल्याची माहिती कोर्टाला दिली आहे. शिवाय स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची माहिती कोर्टास दिली असून त्यांनी त्यांची साक्ष फिरवल्याचा दावा करणार वेगळे प्रतिज्ञापत्र NCBने कोर्टात सादर केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आण मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी एक पत्रक जारी करून उत्तर दिले आहे.
समीर वानखेडे याचे बर्थ सर्टिफिकेट ट्वीट करून नवाब मलिक यांनी ‘यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा’ असे म्हटले आहे. तसेच समीर यांच्या पहिल्या लग्नाची माहिती देणारे ट्वीट मलिक यांनी रिट्वीट केले आहे.