मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिकेतील कलाकार जितेंद्र पोळ याला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. शादी डॉट कॉम वरून ओळख झालेल्या मुलीचा पोळ कडून विनयभंग करण्यात आल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या संशयित अभिनेत्याची त्या मुलीशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यांनतर त्या अभिनेत्याने मुलीला लग्नाची गळ घातली. परंतु त्या मुलीने हा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर संशयित आरोपी त्याचा सर्वत्र पाठलाग करू लागला. तो सतत त्या मुलीवर पाळत ठेवत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर ती मुलगी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊनसुद्धा त्रास दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर या जितेंद्र पोळ संशयित अभिनेत्याने त्या मुलीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत लज्जास्पद वर्तवणूक केल्याचे गुन्ह्यात सांगण्यात आले आहे. तसेच आज सकाळी कोल्हापुरातील राजाराम पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समोर आले असून रात्री उशिरा या संशयितावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तो एका प्रसिद्ध मालिकेत काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.