पोंडीचेरी (भ्रमर वृत्तसेवा) – नाशिकच्या माया सोनवणेने फिरकी गोलंदाजीची जादू दाखवल्यानंतरही महाराष्ट्राला 41 भावांनी आंध्रप्रदेश कडून पराभूत व्हावे लागले.

महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यातील दिवस-रात्र खेळविण्यात आलेल्या महिला सीनियर T20 च्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेश टीमने 20 षटकांत 31 धावा केल्या. त्याला उत्तर देतांना महाराष्ट्राचा संघ 20 षटकात 95 धावा करु शकला. महाराष्ट्राकडून कर्णधार स्मृती मानधना 11, डीपी वैद्य 20, हसब्निस 39 धावा केलेल्या इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही.

तत्पूर्वी येथे झालेल्या महिलांच्या टी-20 क्रिकेट सामन्यात नाशिकची फिरकीपटू माया सोनवणे हिने आपल्या फिरकीची जादू दाखवत आंध्र प्रदेशच्या चार फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला. महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यातील सामन्यात आंध्रप्रदेशने प्रथम फलंदाजी केली. सलामीचे फलंदाज एन.अनुजा आणि झांसी लक्ष्मी यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही भागीदारी मोडण्याचे काम नाशिकची फिरकीपटू माया सोनवणे हिने केले. तिने प्रथम अनुजा हिला 31 धावांवर तर लक्ष्मीला 29 धावांवर बाद केलं. त्यानंतर सुधा राणी हिला 11 धावांवर पद्मजाला दोन धावांवर बाद करून आंध्र प्रदेशला रोखण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला.
आंध्र प्रदेश एक वेळ असे वाटत होते की 20 षटकांत धावांच्या पलीकडे मजल मारेल मात्र नाशिकच्या माया सोनवणे घेतलेल्या 4 बळीमुळे आंध्र प्रदेशला 20 षटकांत 6 बाद 136 धावांमध्ये रोखता आले. मायाने 4 षटकांमध्ये 32 धावा देत चार बळी टिपले. दरम्यान ईश्वरी सावकार आणि प्रियंका घोडके या नाशिककर फलंदाजांना विश्रांती देण्यात आली.