Home अर्थ उद्यापासून बदलणार ‘हे’ पाच नियम; जाणून घ्या सविस्तर

उद्यापासून बदलणार ‘हे’ पाच नियम; जाणून घ्या सविस्तर

0

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : उद्या म्हणजेच 1 डिसेंबर 2021 पासून दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. या बदलांमध्ये गॅस सिलिंडरचे दर, यूएएन (UAN) आणि आधार लिंकिंग, होम लोन ऑफर, एसबीआय (SBI) क्रेडिट कार्ड, लाइफ सर्टिफिकेट इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला नवीन नियम लागू होतात.

व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरचे नवीन दर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला निश्चित केल्या जातात. त्यामुळे उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून या महिन्यासाठीचे नवीन दर जाहीर केले जातील. तसेच तुम्ही जर नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे ईपीएफचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर असेल, तर 30 नोव्हेंबरपर्यंत तो आपल्या आधार क्रमांकाशी लिंक करणे महत्वाचे असणार आहे. कारण 1 डिसेंबर 2021 पासून कंपन्यांना फक्त अशाच कर्मचाऱ्यांचे ईसीआर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यांचे यूएएन आणि आधार लिंकिंग व्हेरिफाय झाले आहे.

तर अनेक बँकांनी होम लोनच्या विविध आणि आकर्षक ऑफर्स आणल्या होत्या. त्यामध्ये प्रोसेसिंग फी माफी, कमी व्याजदर यांचा समावेश होता. काही बँकांची ऑफर्स 31 डिसेंबर रोजी संपणार असली तरी एलआयसी हाउसिंग फायनान्सची ऑफर 30 नोव्हेंबरला संपणार आहे. तसेच ग्राहक जर एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरत असतील तर 1 डिसेंबरपासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महागणार आहे.

दरम्यान अगोदर EMIवर फक्त व्याज द्यावे लागत होते मात्र उद्यापासून यावर प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.तसेच ग्राहक जर पेन्शनधारक असतील तर त्यावर ग्राहकांना लाइफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक असणार आहे. पेन्शनधारकांनी त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे अन्यथा 1 डिसेंबरपासून पेन्शन मिळणे बंद होणार आहे.