‘हिंदुस्थानी भाऊ’ उर्फ विकास फाटकला पोलिसांनी ‘या’ ठिकाणाहून केली अटक

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन (Online examination) घेण्यात याव्यात या मागणीसाठी विद्यार्थींनी काल रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यात मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) अर्थात विकास फाटक (Vikas Pathak) याला अटक केली आहे.

तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान धारावी पोलीस ठाण्यात विकास जयराम फाटक (हिंदुस्थानी भाऊ), (41 वर्षे रा. ठि.19/बी प्यारीनगर गोविंद पाटील खार दांडा,खार पश्चिम मुंबई.) विरोधात रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३,३३२,४२७,१०९, ११४,१४३,१४५,१४६,१४९,१८८,२६९,२७० भा.द.वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंगसह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंदुस्थानी भाऊसह इकरार खान वखार खान (वय 25 वर्षे) यासही पोलिसांनी अटक केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!