मुलीचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बेतले आईच्या जीवावर; 46 वर्षीय महिलेचा मारहाणीत मृत्यू

पालघर । भ्रमर वृत्तसेवा : जिल्ह्यातील बोईसरमधील शिवाजीनगर भागात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 10 फेब्रुवारीला एका मुलीने व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp status) ठेवलेल्या स्टेटसवरुन दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी या हाणामारीत 46 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. लीलावती देवी प्रसाद असे मयत महिलेचे नाव आहे.

तसेच पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेची मुलगी प्रीती प्रसाद (वय, २०) हिने तिच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता. मात्र हे त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना आवडले नाही. यामुळे ती मुलगी तिची आई आणि भावासोबत प्रीतीच्या घरी तिला भांडायला गेली. हे भांडण वाढले आणि हाणामारी झाली. यात लीलावती देवी प्रसाद जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान पीडीत तरुणी प्रिती प्रसादच्या तक्रारीवरून बोईसर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिची आई, भाऊ आणि बहीण यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!