Home क्राईम धक्कादायक : सहा वर्षीय चिमुकलीवर मामाकडून बलात्कार

धक्कादायक : सहा वर्षीय चिमुकलीवर मामाकडून बलात्कार

0

उल्हासनगर  | भ्रमर वृत्तसेवा :  गेल्या आठवड्यात उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून रात्रभर बलात्कार (Minor girl kidnap and rape) केल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण ताजे असताना आता उल्हासनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारे एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका 31 वर्षीय मामाने आपल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार (uncle raped 6 years old niece) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ६ वर्षीय पीडित मुलगी उल्हासनगर पूर्वेत आपल्या आई वडिलांसोबत राहते. तिचे वडील बाहेर कामाला जातात, तर आईही भाजी विक्रीचा व्यवसाय करते. त्यामुळे दिवसभर घरी कोणी नसल्याने पीडित मुलगी जवळच राहणाऱ्या आपल्या आजोबांच्या घरी खेळायला जाते. दरम्यान ३१ वर्षीय मामाची आपल्याच भाचीवर वाईट नजर पडली.

आरोपी मामाने आजोबांच्या घरी आलेल्या या अल्पवयीन भाचीला आपल्या वासनेचा शिकार बनवले. १३ सप्टेंबर रोजी आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला असता, तिच्या वागण्यावरून आईला संशय आला. यानंतर आईने पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. यानंतर पीडितेच्या आईने हिललाईन पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी मामावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच नराधम मामाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  आरोपीला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच हिललाईन पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.