मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीत हत्याकांड (Hinganghat woman ablaze case) प्रकरणातील दोन्ही बाजुचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणाचा अंतिम निकाल ९ फेब्रुवारी रोजी न्यायालय देणार आहे.

तसेच या जळीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सरकारी पक्षातर्फे आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहे. तसेच गुन्हाच्या तरतुदीनुसार परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल, असा विश्वास सरकारी वकिलांकडून व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी नऊ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सरकारी वकील दीपक वैद्य यांनी दिली आहे. तर या प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला.

दरम्यान प्रा.अंकिता पिसुड्डे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर 10 फेब्रुवारीला त्यांचा उपचारादरम्यान नागपूर येथील ऑरेंज सिटीमध्ये मृत्यू झाला होता. या जळीत हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार आरोपी निश्चित केले होते. तसेच या जळीत हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले होते.तर गुन्हेगाराला त्वरित फासावर द्या या मागणीसाठी मोर्चे व निदर्शने करण्यात आली होती.