पुणे । भ्रमर वृत्तसेवा : पुण्यातील बिबवेवाडी येथे पुन्हा एकदा गुंडगिरीचा प्रकार समोर आला असून एका टोळक्याकडून बिबवेवाडीत मध्यरात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री एका तरुणावर या टोळक्यानी गोळीबार करत त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनावर धरुन एका टोळक्याने तरुणावर दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे तो थोडक्यात वाचला. तसेच या टोळक्याने रात्री परिसरात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन दहशत निर्माण परवण्याच्या प्रयत्न केला. जुन्या वादावरुन हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच फिर्यादी आणि आरोपी यांच्यात शुक्रवारी वाघजाई मंदिर येथे भांडण झाले होते.
दरम्यान या गोळीबारप्रकरणी आठ ते दहा जणांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.