विजेचा शॉक लागून मायलेकीचा मृत्यू

सांगली । भ्रमर वृत्तसेवा : जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यातील जाडरबोंबलाद (Jadarbombalad) येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय- 50) आणि विद्या संजय हेळवार (वय- 25) या दोघी मायलेकीचा विजेचा शॉक (Electric shock) लागून जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जाडरबोंबलाद येथील गावाजवळ (village) राहणारे शेतकरी (Farmers) आय एम पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये, म्हणून शेताच्या कडेला बायडीग तारेचे कुंपण करण्यात आले होते. सोमवारी विद्या संजय हेळवार ही विवाहितेस यांची माहिती लक्षात न आल्याने लघुशंकेला गेले असताना शेतावरून गेलेली बायडिंगची तार खाली पडल्याने विद्या हिस शॉक लागला. त्यानंतर तीचा आवाज ऐकून आई सूवर्णा हेळवार या देखील धावत गेल्या काही सांगण्याच्या अगोदर दोघींना जबरदस्त शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दरम्यान याबाबतची फिर्याद माजी सरपंच एम आर अंकलगी यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस (police) करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!