रत्नागिरी । भ्रमर वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळल्याने दाेन्ही बाजूची वाहतुक गेल्या तासभरापासून ठप्प झालेली आहे.

या घाटातील मध्यवर्ती ठिकाणी चौपदरीकरणा अंतर्गत डोंगर कटाई सुरु आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कामी लागली आहे. रस्त्याच्या वरील बाजूस पोकलेनने खोदाई केली जात असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. त्यामध्ये दोन पोकलेन अडकले. तसेच त्याचे चालकही त्यामध्ये अडकले आहेत.

दरम्यान त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्य पोकलेन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच अन्य यंत्रणा ही दाखल झाली आहे. या घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली आहे. तर या घटनेत जेसीबी (jcb) दरडीखाली दबला गेला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.