Home महाराष्ट्र …तर मी राजीनामा देतो – विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान

…तर मी राजीनामा देतो – विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान

0
संग्रहित छायाचित्र

मुंबई | भ्रमर वृत्तसेवा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केले आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, संपूर्ण देशातले ओबीसी आरक्षण सध्या धोक्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत आमच डेटा एकत्र करण्याचे काम आम्ही करुच. मात्र आम्हाला अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याचा विचार आम्ही करु. काहीही मार्ग सापडला नाही तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत.

तसेच सर्व पक्षांचे एकमत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल असेही त्यांनी अधोरेखित केले आणि आजच्या या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.