आमदार नितेश राणेंना ‘त्या’ प्रकरणात सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

सिंधुदुर्ग । भ्रमर वृत्तसेवा : शिवसेनेचे कार्यकर्ते संताेष परब (santosh parab) यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असेलेले भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.तसेच आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या (sindhudurg dcc bank) निवडणुकीपुर्वी हल्ला झाला हाेता. या हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच या हल्ला प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी नितेश राणेंची धावाधाव सुरू होती. अखेर त्यांना या प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी यांनी तर बचाव पक्षाच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज निर्णय देतो असे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार आज जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश हांडे यांनी हा निकाल दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!